राजकीय
    5 days ago

    इंदापूर पंचायत समितीच्या लुमेवाडी गणातून आणासाहेब कोकाटे पाटलांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून उमेदवारी जाहीर सहसंपादक महेश पांडवे मो.9511875416 इंदापूर पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) वतीने लुमेवाडी गणातून आणासाहेब कोकाटे पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ​पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष पदावर कार्यरत असताना आणासाहेब कोकाटे पाटील यांनी गोरगरीब जनतेची कामे अत्यंत तळमळीने केली. तसेच, सर्व शासकीय योजनांचा लाभ गरजू आणि गरीब जनतेपर्यंत पोहोचवण्यात त्यांनी उत्तम काम केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची आणि जनसेवेची दखल घेऊन पक्षाने त्यांना इंदापूर पंचायत समितीच्या महत्त्वाच्या लुमेवाडी गणातून उमेदवारी दिली आहे. ​जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा आणि प्रशासकीय योजनांची माहिती असलेला कार्यकर्ता म्हणून आणासाहेब कोकाटे पाटील यांची ओळख आहे. युवक संघटनेत काम करताना त्यांनी मिळवलेला अनुभव आणि जनसामान्यांशी असलेला त्यांचा संपर्क यामुळे ते लुमेवाडी गणाच्या निवडणुकीत पक्षासाठी एक मजबूत दावेदार ठरतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी व्यक्त केला आहे.​कोकाटे पाटील यांना उमेदवारी मिळाल्याने लुमेवाडी गणातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे या गणाची निवडणूक अधिक चुरशीची होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

    राजकीय

    WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

    Back to top button
    या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.