सामाजिक

अकलूज: प्रभाग ८ मधील पाणीपुरवठा आणि वीज बचतीबाबत नगरसेविका सौ.दिपाली वाघमोडे आक्रमक; प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाला सूचना

प्रतिनिधी सचिन उगाडे

​अकलूज (प्रतिनिधी):
अकलूज नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ८ मधील नागरिकांच्या आरोग्याचा आणि सार्वजनिक मालमत्तेच्या गैरवापराचा प्रश्न गंभीर झाला आहे. नवीन बस स्थानकाच्या पाठीमागील भागात पाइपलाइनमधील तांत्रिक बिघाडामुळे (वॉटर व्हॉल्व्ह गळती) दूषित पाणीपुरवठा होत असून, दुसरीकडे सहकार नगर व औदुंबर नगर भागात भरदिवसा पथदिवे सुरू राहत असल्याचे समोर आले आहे. या समस्यांची दखल घेत प्रभाग क्रमांक ८ च्या नगरसेविका सौ. दिपाली संतोष वाघमोडे यांनी स्वतः प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
​दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
​नवीन बस स्टँडच्या पाठीमागील परिसरात नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनच्या ‘वॉल्व्ह’मध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. या गळतीमुळे पिण्याच्या पाण्यात सांडपाणी किंवा बाहेरील अशुद्ध पाणी मिश्रित होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. यामुळे परिसरात साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.​भरदिवसा दिवे सुरू;विजेचाअपव्यय


​भारतीय स्टेट बँक परिसर, सहकार नगर आणि औदुंबर नगर या भागातील विद्युत खांबांवरील दिवे दिवसभर सुरू राहत असल्याचे पाहणीत आढळले. एकीकडे ऊर्जा बचतीचे आवाहन केले जात असताना, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे होणारा हा विजेचा अपव्यय थांबवून हे दिवे वेळेवर बंद करण्याच्या सूचना सौ. वाघमोडे यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.
​”नागरिकांचे आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे. दूषित पाणीपुरवठ्याची समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी पाणीपुरवठा विभागाला सूचना दिल्या आहेत. तसेच, विजेचा अपव्यय टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांनी पथदिव्यांबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे. या समस्यांकडे दुर्लक्ष झाल्यास पाठपुरावा अधिक तीव्र केला जाईल.”

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.