अकलूजमध्ये रंगणार बैलगाडा शर्यतीचा थरार; शंकरराव मोहिते-पाटील जयंतीनिमित्त भव्य आयोजन

सहसंपादक महेश पांडवे 9511875416
अकलूज (प्रतिनिधी):
दिनांक 14 मार्च 2026 बैलगाडा शर्यत सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांची जयंती आणि विजय गणेशोत्सव मंडळाच्या वतीने अकलूज येथे भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली.
बैलगाडा शौकिनांसाठी
दरवर्षीप्रमाणे यंदाही अकलूजमध्ये बैलगाडा शर्यतीचे नियोजन अत्यंत मोठ्या स्वरूपात करण्यात आले आहे. शंकरराव मोहिते-पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि ग्रामीण संस्कृतीतील हा पारंपरिक खेळ जोपासण्यासाठी मदनसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे आयोजन केले जाते.
सहकारी महर्षी शंकराव मोहिते-पाटील जयंती व विजय गणेशोत्सव मंडळ उत्सव.
प्रमुख उपस्थिती: राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील दिग्गज मान्यवर.
सहभाग: पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील नामवंत बैलगाडा मालक या स्पर्धेत सहभागी होण्याची शक्यता आहे.

मदनसिंह मोहिते-पाटील यांचे कार्य
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून मदनसिंह मोहिते-पाटील यांनी शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. केवळ प्रशासकीय कामकाजच नव्हे, तर क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचा मोठा पुढाकार असतो. “बैलगाडा शर्यत हा शेतकऱ्यांच्या अस्मितेचा विषय असून, शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने या शर्यती पार पडतील,” असा विश्वास मदनदादांनी व्यक्त केला आहे.
या स्पर्धेमुळे अकलूजमध्ये बैलगाडा शौकिनांची मोठी गर्दी होणार असून, प्रशासनाकडून आणि संयोजकांकडून जय्यत तयारी सुरू आहे.
