राष्ट्रवादी काँग्रेसचा युवा चेहरा: वडापुरी-माळवाडी गटातून यशराज जगदाळे यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी जाहीर

सहसंपादक महेश पांडवे 9511875416
इंदापूर:
पुणे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने इंदापूर तालुक्यातील वडापुरी-माळवाडी जिल्हा परिषद गटातून युवा नेतृत्व यशराज आप्पासाहेब जगदाळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. पक्षाने एका तरुण चेहऱ्याला संधी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
युवा नेतृत्वावर विश्वास
यशराज जगदाळे हे गेल्या अनेक वर्षांपासून वडापुरी आणि माळवाडी परिसरात सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. त्यांचे वडील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचा या भागातील दांडगा जनसंपर्क आणि त्यांनी केलेली विकासकामे ही यशराज यांच्यासाठी जमेची बाजू ठरणार आहे. तरुणांचे संघटन आणि स्थानिक प्रश्नांची जाण यामुळे पक्षाने त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे.
मतदारसंघात उत्साहाचे वातावरण
उमेदवारी जाहीर होताच वडापुरी आणि माळवाडी परिसरात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. “हा विजय सामान्य जनतेचा आणि तरुणांचा असेल,” अशी भावना जगदाळे समर्थकांनी व्यक्त केली आहे. या गटात प्रस्थापित नेत्यांसमोर यशराज जगदाळे यांचे आव्हान आता अधिक प्रभावी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.







