प्रवीण माने यांचे खंदे समर्थक भागवत जाधव यांचा काटी लाखेवडी गटातून अपक्ष अर्ज दाखल!

प्रतिनिधी महेश पांडवे
इंदापूर: तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, भाजप नेते प्रवीण भैय्या माने यांचे एकेकाळचे अत्यंत विश्वासू आणि खंदे समर्थक भागवत जाधव यांनी काटी-लाखेवडी गटातून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कोणत्याही राजकीय वारशाशिवाय एका सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाने घेतलेल्या या निर्णयामुळे प्रस्थापितांचे धाबे दणाणले आहेत.कोणताही ‘वरदहस्त’ नाही, फक्त जनशक्तीचा आधार
भागवत जाधव यांची ओळख एक सामान्य, कष्टाळू आणि तळागाळातील कार्यकर्ता म्हणून आहे. त्यांच्या मागे कोणताही मोठा राजकीय वारसा नाही किंवा कोणत्याही मोठ्या पक्षाचा अधिकृत वरदहस्त नाही. केवळ जनसंपर्क आणि सामान्यांच्या प्रश्नांची जाण या बळावर त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे.गरीब कुटुंबातील नेतृत्व: एक सामान्य तरुण जेव्हा प्रस्थापितांविरुद्ध उभा राहतो, तेव्हा त्याकडे ‘डेव्हिड विरुद्ध गोलायथ’ अशा संघर्षाच्या नजरेतून पाहिले जात आहे.स्थानिक समीकरणे बदलणार: काटी-लाखेवडी गटात जाधव यांच्या उमेदवारीमुळे मतांचे विभाजन होण्याची दाट शक्यता असून, याचा फटका बड्या पक्षांच्या उमेदवारांना बसू शकतो.
”मी एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आहे. आजपर्यंत कार्यकर्त्यांच्या जीवावर मोठे झालेले नेते पाहिले, पण आता कार्यकर्त्यांनीच नेतृत्व करण्याची वेळ आली आहे. मला कोणत्याही पक्षाचा पाठिंबा नसला तरी जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे.
आता ही लढत ‘धनशक्ती विरुद्ध जनशक्ती’ अशी होणार असून, काटी लाखेवडी गटातील मतदार या तरुण आणि सामान्य कार्यकर्त्याला साथ देणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.







