सोलापुरात. राजकीय वादातून मनसे पदाधिकाऱ्याची हत्या; बिनविरोध निवडणुकीच्या प्रयत्नांना रक्तपाताचे गालबोट.
मनसे नेत्याची हत्या

संपादक सुनील निकम 7038353599
सोलापूर .शहरातील जोशी गल्ली परिसरात राजकीय वैमनस्यातून मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी स्थानिक निवडणुका बिनविरोध करण्याच्या प्रयत्नांवरून झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जोशी गल्ली परिसरात दोन राजकीय गटांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. एका बाजूने निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असताना, दुसऱ्या गटाचा त्याला विरोध होता. याच वादाचे रूपांतर तीव्र संघर्षात झाले.
दोन गटांमध्ये झालेल्या या राड्यात मनसेचे निष्ठावान कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते,

मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
हत्येची बातमी पसरताच जोशी
गल्ली आणि आसपासच्या परिसरात
तणाव निर्माण झाला आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी या भागात मोठा फौजफाटा तैनात केला आहे.
राजकीय संताप: मनसे कार्यकर्त्यांकडून या घटनेचा तीव्र निषेध केला जात असून, आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे.
तपास सुरू: पोलिसांनी या प्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेतले असून, सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीवरून तपास वेगाने सुरू केला आहे.
पोलिस प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. “राजकीय वादातून ही घटना घडल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. आम्ही सर्व बाजूंनी तपास करत असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईलअसे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.







