इंदापुरात ‘पॉवर गेम’: भरणे-पाटील घराण्यातील पुढची पिढी जिल्हा परिषदेच्या रिंगणात!

सहसंपादक महेश पांडवे 9511875416
इंदापूर:
पुणे. जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या इंदापूर तालुक्यात आता राजकीय वारसा हक्काची लढाई अधिक तीव्र होताना दिसत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे आणि राष्ट्रवादी शरद पवार (गट) दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील-ठाकरे हे दोघेही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत.
युवा नेतृत्वाचा उदय
तालुक्यातील दोन प्रबळ राजकीय घराणी आता आपल्या युवा वारसांना मैदानात उतरवून आपली पकड घट्ट करण्याच्या प्रयत्नात आहेत.

अंकिता पाटील-ठाकरे: यांनी यापूर्वीच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. त्या अनुभवी असून, सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी तरुणांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
दुसरीकडे, मंत्री दत्तात्रय भरणे यांचे सुपुत्र श्रीराज भरणे हे देखील गेल्या काही काळापासून तालुक्यात सक्रिय झाले आहेत. वडिलांच्या विकासकामांची शिदोरी आणि तरुणांचे संघटन ही त्यांची जमेची बाजू मानली जात आहे.
का प्रतिष्ठेची ठरणार ही निवडणूक?
केवळ एका गटाची नसून ती आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम मानली जात आहे.







