सामाजिक

अकलूज पोलीस स्टेशनतर्फे महिला दिनानिमित्त नारी शक्तीचा सन्मान; नगराध्यक्षा रेश्मा ताई आडगळे यांची प्रमुख उपस्थिती

सहसंपादक महेश पांडवे 9511875416

​अकलूज: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अकलूज पोलीस स्टेशनच्या वतीने महिलांचा गौरव आणि सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून अकलूज नगर परिषदेच्या नगराध्यक्षा रेश्मा ताई आडगळे उपस्थित होत्या.
​कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा आणि पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना नगराध्यक्षा रेश्मा ताई आडगळे यांनी महिलांच्या कर्तृत्वाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या की, “आज प्रत्येक क्षेत्रात महिला आपल्या जिद्दीच्या जोरावर ठसा उमटवत आहेत. पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या महिला भगिनी अहोरात्र समाजाच्या सुरक्षिततेसाठी काम करत आहेत, ही अभिमानास्पद बाब आहे.
​अकलूज पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कार्यक्रमाला पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि शहरातील प्रतिष्ठित महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सदैव तत्पर असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.