महाराष्ट्र

नीरा नदीच्या पात्रात अवतरले छत्रपती शिवराय! सराटीत शिवभक्तांनी साकारला विलोभनीय ‘तरंगता’ देखावा

प्रतिनिधी महेश पांडवे 9511875416

​इंदापूर (सराटी): ‘प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावंतस, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय!’ अशा जयघोषाने नीरा नदीचा परिसर दुमदुमून गेला. निमित्त होते शिवजयंतीचे आणि आकर्षण होते शिवभक्तांनी नदीच्या संथ पाण्यावर साकारलेल्या विशाल तरंगत्या देखाव्याचे.
​इंदापूर तालुक्यातील सराटी अकलूज आणि परिसरातील शिवभक्तांनी आपल्या लाडक्या राजाला अभिवादन करण्यासाठी सालाबादप्रमाणे यंदाही कल्पकता लढवली. नीरा नदीच्या पात्रात महाराजांची भव्य प्रतिमा आणि स्वराज्य दर्शवणारे देखावे पाण्यावर तरंगताना पाहून उपस्थित जनसमुदाय थक्क झाला.


​नदीच्या पात्रात मांडणी: हा देखावा जमिनीवर नसून चक्क नीरा नदीच्या पात्रात तरंगत्या स्वरूपात तयार करण्यात आला होता.हुबेहुब प्रतिमा: शिवरायांची सिंहासनारूढ प्रतिमा आणि किल्ल्यांची प्रतिकृती अतिशय सुबकपणे मांडण्यात आली होती.
​नयनरम्य दृश्य: रात्रीच्या वेळी करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईमुळे नदीच्या पाण्यात पडणारे प्रतिबिंब या देखाव्याची शोभा अधिकच वाढवत होते.शिवभक्तांचा उत्साहहा देखावा पाहण्यासाठी सराटीसह इंदापूर तालुक्यातील हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. “नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे आणि महाराजांच्या अथांग कार्याला साजेसे करण्याचा आमचा प्रयत्न होता,” अशा भावना आयोजक शिवभक्तांनी व्यक्त केल्या.
​पाण्यावर तरंगणारा हा देखावा सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, सर्व शिवभक्तांच्या या कल्पकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.