अकलूजमध्ये शिवजयंतीला आवाजाची मर्यादा ओलांडणे भोवले; डॉल्बी मालक आणि मंडळांवर गुन्हे दाखल

सहसंपादक महेश पांडवे 9511875416
अकलूजमध्ये शिवजयंती उत्सवादरम्यान ध्वनी प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवून मोठ्या आवाजात डॉल्बी (DJ) लावणाऱ्या मंडळांवर आणि डॉल्बी मालकांवर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई केली आहे. आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित डीजे साहित्य जप्त करण्यात आले असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस प्रशासनाची धडक कारवाई
सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी उत्सवादरम्यान शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास येताच अकलूज पोलिसांनी तातडीने कारवाईचा बडगा उगारला.
ही संपूर्ण कारवाई खालील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली:
संतोष वाळके साहेब (उपविभागीय पोलीस अधिकारी
नीरज उबाळे साहेब (पोलीस निरीक्षक, अकलूज पोलीस स्टेशन)
जप्ती आणि गुन्हे दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, मिरवणुकीत ठरवून दिलेल्या डेसिबल मर्यादेपेक्षा जास्त आवाजात संगीत वाजवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर आणि डीजे मालकांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तसेच, आवाजाचे उल्लंघन करणारे डीजे संच आणि संबंधित तांत्रिक साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.
पोलीस प्रशासनाचे आवाहन: “उत्सव साजरा करताना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ध्वनी प्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि लहान मुलांना त्रास होतो. यापुढेही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केलेली शिवजयंती उत्सव मंडळे खालील प्रमाणे”हिंदवी प्रतिष्ठान डेसिबल 108 लहुजी साम्राज्य प्रतिष्ठान 115 सह्याद्री प्रतिष्ठान 105 छावा ग्रुप 105 स्वराज्य प्रतिष्ठान112 शिवदत्त प्रतिष्ठान110 शिवदत्त प्रतिष्ठान110 नवक्रांती प्रतिष्ठान117 राम रहीम प्रतिष्ठान118 संभाजी राजे प्रतिष्ठान125 शिवमुद्रा प्रतिष्ठान110 महाराज प्रतिष्ठान107 व सर्व डीजी डॉल्बीधारक यांच्यावर पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात आली

