भाजपचा बालेकिल्ला मजबूत करण्यासाठी भैय्यासाहेब कोकाटे रिंगणात; बावडा-लुमेवाडी गणातून पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल

सहसंपादक महेश पांडवे 9511875416
इंदापूर/बावडा:
पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, बावडा-लुमेवाडी गणातून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून भैय्यासाहेब कोकाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज अत्यंत उत्साहात दाखल केला. प्रवीण भैय्या माने यांचे ते खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात या निवडीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पाहायला मिळत आहे.
शक्तीप्रदर्शनाने वेधले लक्ष

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संवाद मेळावा पार पडला. यावेळी ‘भारतीय जनता पार्टीचा विजय असो’ आणि ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. भैय्यासाहेब कोकाटे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज सुपूर्द केला.
विकासाचा अजेंडा आणि जनसंपर्क
हे त्यांच्या दांडग्या जनसंपर्कासाठी ओळखले जातात. अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की:
”बावडा . लुमेवाडी गणातील प्रलंबित प्रश्न सोडवणे आणि केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना तळागाळातील सामान्य माणसापर्यंत पोहोचवणे हेच माझे मुख्य उद्दिष्ट आहे. भाजपच्या विकासकामांच्या जोरावर आम्ही ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकू. असा विश्वास व्यक्त केला







