बावडा-लुमेवाडीत ‘पॉवर गेम’! हर्षवर्धन पाटील आणि दत्तामामांच्या एकत्र येण्याचा १००% फायदा होईल; अंकिता पाटलांचा विश्वास.
विजयाची शंभर टक्के खात्री अंकिता पाटील .

सहसंपादक सुनील निकम 7038353599
इंदापूर: जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. बावडा-लुमेवाडी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्यासाठी सज्ज असलेल्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी राजकीय समीकरणांवर मोठे विधान केले आहे. “हर्षवर्धन पाटील आणि कृषिमंत्री दत्तामामा भरणे एकत्र आल्याचा शंभर टक्के फायदा निवडणुकीत होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय कट्टर प्रतिस्पर्धी राहिलेले पाटील आणि भरणे आता एकाच व्यासपीठावर किंवा एकाच विचाराने पुढे जात असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या दोन्ही नेत्यांची ताकद एकत्र आल्यास बावडा-लुमेवाडी गटात विरोधकांचे आव्हान संपुष्टात येईल, असे अंकिता पाटील म्हणाल्या. विकासकामांची गती आणि कार्यकर्त्यांची वज्रमुठ यामुळे ही निवडणूक एकतर्फी होईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.







