✍️ पत्रकारिता आणि पोलीस प्रशासनाचा गौरवशाली संगम..!

पोलीस क्राईम नामा न्यूज नेटवर्क.9511875416
मोहोळ.
पोलीस क्राईम नामा न्यूजच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारी संपादकपदी श्री दादासाहेब तानाजी जगताप यांची निवड; मोहोळ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक श्री दीपक जोतिराव पाटील यांच्या हस्ते भव्य सत्कार… त्यानंतर पोलीस क्राईम नामा न्यूजचे मुख्य संपादक श्री महेश खडके , संपादक श्री सुनील निकम, सहसंपादक श्री महेश पांडवे तसेच महाराष्ट्र राज्य कार्यकारी संपादक श्री दादासाहेब तानाजी जगताप यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक श्री दीपक जोतिराव पाटील यांचाही सन्मानपूर्वक गौरव..!
निर्भीड पत्रकारिता आणि लोकाभिमुख पोलीस सेवेचा परस्पर सन्मान; समाजहिताच्या कार्याला नवी दिशा देणारा प्रेरणादायी सोहळा..!
लोकशाहीच्या बळकटीकरणामध्ये पत्रकारिता आणि पोलीस प्रशासन या दोन्ही घटकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. पत्रकार समाजातील जनतेच्या समस्या, विकासकामे, सामाजिक प्रश्न आणि लोकहिताचे विषय शासन व प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे कार्य करतात, तर पोलीस प्रशासन नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण, कायदा व सुव्यवस्था राखणे आणि
समाजात सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी अहोरात्र कार्यरत असते. या दोन्ही क्षेत्रांतील परस्पर विश्वास, समन्वय आणि सन्मानाचे दर्शन घडविणारा एक प्रेरणादायी सोहळा मोहोळ पोलीस ठाणे येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
समाजहितासाठी केलेली त्यांची निःस्वार्थ, निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता, ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न आणि पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदान याची दखल घेऊन हा सन्मान करण्यात आला.यावेळी पोलीस निरीक्षक श्री दीपक जोतिराव पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “समाजात जबाबदार पत्रकारितेचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. सत्य आणि वस्तुनिष्ठ वृत्तांकन करणारे पत्रकार हे लोकशाहीचे खरे प्रहरी आहेत. समाजहितासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. श्री दादासाहेब जगताप यांनी ग्रामीण भागातील अनेक प्रश्न प्रभावीपणे मांडून पत्रकारितेची सामाजिक बांधिलकी जपली आहे.”श्री दादासाहेब जगताप यांनी शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला, आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास, सहकार, शासकीय योजना, सामाजिक प्रश्न आणि सर्वसामान्य नागरिकांच्या न्यायाच्या लढ्यात सातत्याने लोकाभिमुख पत्रकारिता केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांच्यावर महाराष्ट्र राज्य कार्यकारी संपादक पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.यानंतर परस्पर सन्मानाची परंपरा जपत पोलीस क्राईम नामा न्यूज परिवारातर्फे मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री दीपक जोतिराव पाटील यांचाही शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.हा सन्मान पोलीस क्राईम नामा न्यूजचे मुख्य संपादक श्री महेश खडके संपादक श्री सुनील निकम, सहसंपादक श्री महेश पांडवे तसेच महाराष्ट्र राज्य कार्यकारी संपादक श्री दादासाहेब तानाजी जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.PI. पाटील साहेब यांनी मोहोळ तालुक्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केलेले उल्लेखनीय कार्य, जनतेशी जपलेला सुसंवाद, गुन्हे प्रतिबंधासाठी राबविलेल्या प्रभावी उपाययोजना, नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाबद्दल विश्वास निर्माण करण्यासाठी घेतलेले उपक्रम आणि लोकाभिमुख पोलीस सेवेबद्दल त्यांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी श्री गजानन माळी पोलीस यांच्यासह मोहोळ पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी या परस्पर सत्काराचे मनापासून स्वागत करत पत्रकारिता आणि पोलीस प्रशासन यांच्यातील स्नेह अधिक दृढ होण्यास हा कार्यक्रम मोलाचा ठरेल, असे मत व्यक्त केल.






