ताज्या घडामोडी

भैरवनाथ कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन

कार्यकारी संपादक. दादासाहेब जगताप मो.८०५५६५१३००

अंकोली : मोहोळ तालुक्यातील मौजे अंकोली येथील भैरवनाथ कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन, वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्यविषयक जनजागृती या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.
पंचायत समिती, मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सोलापूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय प्रशिक्षणाच्या धर्तीवर हा उपक्रम राबविण्यात आला. श्रीमती थोरात मॅडम यांनी विद्यार्थिनींना मासिक पाळीदरम्यान स्वच्छता कशी राखावी, आरोग्याची योग्य काळजी कशी घ्यावी, तसेच विविध आरोग्यविषयक समस्या उद्भवल्यास योग्य मार्गदर्शन घेण्याचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती दिली.मासिक पाळीविषयी असलेले गैरसमज दूर करणे, वैयक्तिक स्वच्छतेच्या योग्य सवयी लावणे,आरोग्याच्या समस्या दुर्लक्षित न करणे,
गरज भासल्यास पालक, शिक्षक किंवा आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला घेणे याबाबत विद्यार्थिनींमध्येजनजागृती करण्यात आली. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थिनींशी मुक्त संवाद साधण्यात आला. विद्यार्थिनींनी विविध प्रश्न व शंका मांडल्या. त्यांच्या प्रश्नांना सोप्या आणि समजण्यास सहज अशा पद्धतीने उत्तरे देऊन आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमास प्राचार्य पवार सर, विभागप्रमुख पाटील सर, कर्मवीर अकॅडमीचे मास्टर ट्रेनर पवार सर तसेच प्राध्यापक गुटाळ सर यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थिनींच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.“योग्य माहिती – निरोगी सवयी – आत्मविश्वासपूर्ण विद्यार्थिनी” या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थिनींसाठी निश्चितच उपयुक्त ठरला

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.