विशेष

अकलूज पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते ‘सन्मानपत्र’ देऊन गौरव!

सह.संपादक महेश पांडवे 9511875416

​अकलूज (प्रतिनिधी):
विविध प्रकारच्या गंभीर आणि गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा तातडीने छडा लावून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखल्याबद्दल, अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक (SP) अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते विशेष सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. पोलिसांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
​गुन्ह्यांचा तातडीने छडा; पोलिसांची तत्परता
​अकलूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांत घडलेल्या विविध गुन्ह्यांचा तपास लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र, पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अकलूज पोलिस हेड कॉन्स्टेबल विनोद साठे कदम क्षीरसागर घाटगे मदभावे

गवळे जगताप खरात या पथकानेअत्यंत आधुनिक तंत्रज्ञान, खबऱ्यांचे जाळे आणि कौशल्याचा वापर करून अत्यंत कमी वेळेत अनेक गुन्ह्यांचा तातडीने शोध लावला. आरोपींना गजाआड करून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना मोठे यश आले.
​पोलीस अधीक्षकांकडून पाठीवर कौतुकाची थाप
​अकलूज पोलिसांच्या या वेगवान आणि कौतुकास्पद कामगिरीची दखल सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी घेतली. त्यांनी पोलीस निरीक्षक नीरज उबाळे व त्यांच्या संपूर्ण टीमला बोलावून त्यांचे विशेष अभिनंदन केले आणि त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘सन्मानपत्र’ प्रदान केले.
​”गुन्ह्यांची उकल जलद गतीने करून नागरिकांना न्याय देणे हे पोलिसांचे मुख्य कर्तव्य आहे. अकलूज पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि कर्तव्यदक्षता इतर पोलीस ठाण्यांसाठीही प्रेरणादायी आहे.”
अतुल कुलकर्णी साहेब SP. (पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण)

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.