स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई! महाराष्ट्रासह तेलंगणा राज्यात घरफोडी करणाऱ्या आरोपीकडून ४८ किलो तांब्याची तार जप्त
मोहोळ पोलिसांच्या तपासातून घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा; सुमारे ₹५,७६,६०० किमतीचा मुद्देमाल हस्तगत

कार्यकारी संपादक. दादासाहेब जगताप मो.८०५५६५१३००
मोहोळ : सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने सोलापूर ग्रामीण पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात महाराष्ट्रासह तेलंगणा राज्यात घरफोडी करणाऱ्या एका आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ४८ किलो वजनाची अंदाजे ₹५,७६,६०० रुपये किमतीची तांब्याची मुद्देमालाची तार जप्त करण्यात आली आहे.
सोलापूर उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मोहोळ पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी सोलापूर ते पुणे महामार्गावरील वीरवडे केबिनजवळ तांब्याची तार घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत संशयिताला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान त्याने आपले नाव सचिन उर्फ सच्च्या अभिमान उर्फ अभिमन्यू काळे, वय ३२ वर्षे, रा. एकता नगर, सांगली जिल्हा, सध्या रा. यल्लमवाडी, ता. मोहोळ, जि. सोलापूर असे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार बाबा छप्प-या काटे, रा. यल्लमवाडी, ता. मोहोळ याच्यासह विविध ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद आहे.
महाराष्ट्र व तेलंगणातील गुन्ह्यांचा तपास आरोपी सचिन अभिमन्यू उर्फ अभिमान काळे याच्याविरुद्ध मोहोळ, बार्शी तालुका, वैराग, कामती तसेच तेलंगणा राज्यातील महेबूबनगर ग्रामीण व महेबूबनगर शहर पोलीस ठाण्यांमध्ये विविध गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून ४८ किलो वजनाची तांब्याची तार जप्त करून ती गुन्ह्याच्या तपासासाठी ताब्यात घेतली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कवाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईमध्ये पोलीस सापोनि संजय राठोड, पोलीस हवालदार सलीम बागवान, हरीदास पांढरे, विश्व कलशेट्टी, नागेश कोंढे, व्यंकटेश मारे, नजीर राठोड, पो.कॉ. दिनेश पवार, योगेश जाधव, कपील काटकर, सुनील पवार, अशोक हुलसंगी, मपोका सुंदा झळके, पल्लवी इंगळे-पाटील तसेच मोहोळ पोलीस ठाणे येथील अधिकारी व अंमलदारांचा सहभाग होता.







