मंगळवेढ्याचे पोलिस उपनिरीक्षक नागेश बनकर राज्यस्तरीय फायरिंग प्रशिक्षणात अव्वल; प्रशस्तीपत्रक देऊन गौरव

महाराष्ट्र कार्यकारी संपादक .दादासाहेब जगताप
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष, धाडसी, शिस्तप्रिय आणि अचूक नेमबाजीसाठी ओळखले जाणारे पोलिस उपनिरीक्षक नागेश बनकर यांनी राज्यस्तरीय फायरिंग प्रशिक्षणात उत्कृष्ट कामगिरी करत अव्वल क्रमांक पटकावून मंगळवेढा पोलिस दलाचा नावलौकिक उंचावला आहे. त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल त्यांना प्रशस्तीपत्रक प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हा गौरव राखीव पोलिस निरीक्षक दिलीपचंद्र कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पोलिस हवालदार तानाजी मुदगूल, राकेश ढाकणे, शब्बीर मुजावर तसेच पोलिस विभागातील अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. राज्यपोलिस दल अधिक सक्षमकरण्यासाठी विशेष प्रशिक्षण
राज्याचे पोलिस महासंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची शस्त्र हाताळणी, नेमबाजीतील अचूकता, मानसिक तयारी आणि संकटसमयी जलद प्रतिसाद देण्याची क्षमता वाढावी या उद्देशाने दि. २५, २६ व २७ जून रोजी तीन दिवसीय विशेष फायरिंग प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात राज्यातील विविध जिल्ह्यांतील अधिकारी सहभागी झाले होते.
तीनप्रकारच्याफायरिंगमध्येउल्लेनीय यशप्रशिक्षणादरम्यान ग्रुपिंग फायर, ॲप्लिकेशन फायर आणि स्नॅप फायर या महत्त्वपूर्ण प्रकारांची कठोर चाचणी घेण्यात आली. प्रत्येक प्रकारात अचूक लक्ष्यभेद, शिस्त, वेग, आत्मविश्वास आणि परिस्थितीनुसार निर्णय घेण्याच्या क्षमतेची परीक्षा घेण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक नागेश बनकर यांनी सर्वच टप्प्यांवर उत्कृष्ट कामगिरी करत विशेषतः वेस्ट फायर प्रकारात अव्वल स्थान मिळवून आपल्या नेमबाजीचे कौशल्य सिद्ध केले.
◆ २६/११ नंतरच्या विशेष सुरक्षा पथकाचा अनुभव
मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर राज्य शासनाने स्थापन केलेल्या जलद प्रतिसाद पथकात (Quick Response Team) पोलिस उपनिरीक्षक नागेश बनकर यांनी सन २०२३ मध्ये जबाबदारीने सेवा बजावली आहे. दहशतवादविरोधी मोहिमा, आपत्कालीन परिस्थितीतील कार्यवाही आणि अत्याधुनिक शस्त्र हाताळणीचा त्यांचा अनुभव राज्यस्तरीय प्रशिक्षणादरम्यानही प्रकर्षाने दिसून आला. कर्तव्यनिष्ठ अधिकारीम्हणूनवेगळी ओळख
नागेश बनकर हे आपल्या शांत, संयमी आणि शिस्तबद्ध स्वभावामुळे तसेच प्रामाणिक व जनाभिमुख कार्यपद्धतीमुळे पोलिस दलात वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. कायदा व सुव्यवस्था राखताना त्यांनी नेहमीच जबाबदारी, तत्परता आणि धाडस यांचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विशेष आदराची भावना आहे.
मंगळवेढा पोलिस दलासाठी अभिमानाची बाब
राज्यस्तरीय फायरिंग प्रशिक्षणातील हे यश केवळ पोलिस उपनिरीक्षक नागेश बनकर यांच्यासाठीच नव्हे, तर मंगळवेढा पोलिस ठाणे, सोलापूर जिल्हा पोलिस दल आणि संपूर्ण महाराष्ट्र पोलिस दलासाठी अभिमानास्पद ठरले आहे. त्यांच्या या यशामुळे पोलिस दलातील नवोदित अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळणार असून, उत्कृष्ट प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण सरावातून मोठी कामगिरी करता येते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
◆ प्रशस्तीपत्रकाने गौरव; अभिनंदनाचा वर्षाव
राज्यस्तरीय प्रशिक्षणातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांना प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व वरिष्ठ अधिकारी, सहकारी कर्मचारी आणि मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या. सामाजिक, प्रशासकीय आणि विविध स्तरांतूनही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.कर्तव्यनिष्ठा, शिस्त, धाडस, प्रामाणिकपणा आणि अचूक नेमबाजी यांचा उत्कृष्ट संगम असलेले पोलिस उपनिरीक्षक नागेश बनकर राहो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा!






