ताज्या घडामोडी

मंदिर सुरक्षेसाठी मोहोळ पोलिसांची महत्त्वपूर्ण बैठक; पुजारी, ट्रस्टी व व्यवस्थापकांना सुरक्षेच्या उपाययोजनांच्या सूचना …

कार्यकारी संपादक. दादासाहेब जगताप

मोहोळ. CCTV, सायरन, सुरक्षा रक्षक, प्रखर प्रकाश व्यवस्था अन् गाभाऱ्याच्या सुरक्षेवर विशेष भरमंदिरांची सुरक्षा अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने आज दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी मोहोळ पोलीस ठाणे येथे मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध मंदिरांचे पुजारी, ट्रस्टी व मंदिर व्यवस्थापकांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. मंदिर व्यवस्थापन तसेच भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत बैठकीत सविस्तर सूचना देण्यात आल्या. मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी CCTV कॅमेरे बसविणे, सायरन व्यवस्था कार्यान्वित ठेवणे, प्रवेशद्वारांवर तपासणी व्यवस्था, रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती तसेच परिसरात पुरेशी व प्रखर प्रकाश व्यवस्था ठेवण्यावर विशेष भर देण्यात आला. CCTV यंत्रणा अद्ययावत ठेवण्याच्या सूचना
मंदिर सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवावेत. आधीपासून CCTV कॅमेरे बसविले असल्यास ते व्यवस्थित कार्यरत आहेत की नाही, याची वेळोवेळी तपासणी करावी. तसेच CCTV फुटेज नियमितपणे तपासून यंत्रणा अद्ययावत ठेवावी, अशा सूचना देण्यात आल्या.मंदिर परिसरात प्रखर प्रकाश व्यवस्था
मंदिर परिसरातील अंधाऱ्या भागांमध्ये अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी पुरेशी व प्रखर प्रकाश व्यवस्था करावी. मंदिर परिसर, प्रवेशद्वार तसेच इतर संवेदनशील ठिकाणी प्रकाश व्यवस्था कायम कार्यरत राहील, याची दक्षता घ्यावी.प्रवेशद्वारांवर तपासणी आवश्यक
मंदिराच्या प्रवेशद्वारावर आवश्यक ती तपासणी यंत्रणा कार्यरत ठेवावी. मंदिर परिसरात एखादी शंकास्पद व्यक्ती आढळल्यास किंवा तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्यास संबंधितांनी स्वतःहून कोणतीही कारवाई न करता तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले.
मुख्य गाभाऱ्याच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष
मंदिरातील मुख्य गाभाऱ्याच्या सुरक्षेसाठी मजबूत लोखंडी ग्रील करून घ्यावी. मंदिरातील सर्व प्रवेशद्वारे मजबूत लोखंडी करून घेण्याबाबतही सूचना देण्यात आल्या. दिवसा-रात्री सुरक्षा रक्षकांची नियुक्ती
मंदिराच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार दिवसा तसेच रात्री सुरक्षा रक्षक नेमावेत. विशेषतः यात्रा, उत्सव व गर्दीच्या कालावधीत सुरक्षेची अतिरिक्त व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले.मौल्यवान वस्तू व दानपेटीबाबत खबरदारी
मंदिरामध्ये उत्सवाच्या काळात मौल्यवान वस्तू किंवा मूर्ती आणण्यात आल्यास त्यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घ्यावी. रात्रीच्या वेळी मौल्यवान वस्तू बँकेत अथवा सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करावी.
तसेच मंदिरातील दानपेटी अथवा दानपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम साठवून ठेवू नये. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही.
संशयास्पद हालचालींकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन
मंदिर परिसरात एखादी अनोळखी किंवा संशयित व्यक्ती विनाकारण वारंवार येत असेल, रेंगाळत थांबत असेल किंवा संशयास्पद हालचाली करताना आढळल्यास, मंदिर व्यवस्थापनाने तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले.
यात्रा व उत्सव काळात पोलिसांच्या सूचनांचे पालन
यात्रा व उत्सवाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असल्याने पोलीस प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. गर्दीचे नियोजन, प्रवेश-निर्गमन व्यवस्था आणि सुरक्षेच्या इतर उपाययोजनांकडे विशेष लक्ष द्यावे.
सायरन व्यवस्था कार्यान्वित ठेवण्याच्या सूचना
मंदिर परिसरात आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ सूचना मिळावी यासाठी सायरनची व्यवस्था कार्यान्वित ठेवावी. मंदिर परिसरातील सर्व सुरक्षा यंत्रणा नियमित तपासून त्या कोणत्याही वेळी वापरण्यास योग्य स्थितीत आहेत की नाही, याची खात्री करावी.
मंदिर सुरक्षा ही केवळ पोलिसांची जबाबदारी नसून मंदिर व्यवस्थापन, पुजारी, ट्रस्टी, भाविक आणि नागरिक यांच्या सामूहिक सतर्कतेतून ती अधिक प्रभावी होऊ शकते. त्यामुळे संशयास्पद हालचालींकडे दुर्लक्ष न करता तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ संपर्क साधा
११२ — आपत्कालीन मदत
०२१८९ / २३२२३३ — मोहोळ पोलीस ठाणे
“सतर्कता, सुरक्षितता आणि सहकार्य—मंदिर सुरक्षेसाठी प्रत्येकाची जबाबदारी!”

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.