ताज्या घडामोडी

विश्रामबाग पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! पाच घरफोडीचे गुन्हे उघड; १६ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त

संपादक. सुनील निकम ७०३८३५३५९९

पुणे : विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या पथकाने घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करत महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. पोलिसांनी पाच घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणत सुमारे १६ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक विकास भिंगारदिवे आणि गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रमेश लाहीगुडे यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश कारके, पोलीस उपनिरीक्षक महबूब मोकाशी, सत्यवान गेंड, सचिन कदम, नितीन मुंडे, शशिकांत दरेकर, कैलास डुकरे, जाकिर मणियार, अनिल शेख, शिवदत्त गायकवाड, फिरोज इनामदार, सागर मोरे, अर्जुन थोरात आणि रेश्मा दिवटे यांनी सहभाग घेतला.
तपासादरम्यान पाच घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावत चोरीस गेलेले सुमारे १६ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले. या कारवाईमुळे घरफोडीच्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या तपासाला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे.
विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या गुन्हे अन्वेषण पथकाने केलेल्या या उल्लेखनीय कारवाईचे परिसरातून कौतुक होत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.