खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते केशव डीहाइड्रेटेस फूड्स चे उद्घाटन
स्वामीनारायण महंत पुणे यांच्याहस्ते दीप प्रज्वलन

प्रतिनिधी विलास पवार
अकलूज (प्रतिनिधी):
येथील प्रसिद्ध उद्योग समूहाच्या वतीने नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘केशव डीहाइड्रेटेस फूड्स’ या भव्य शॉप चे उद्घाटन अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न झाले. या कार्यक्रमाला आध्यात्मिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी जमली होती.
महंतांच्या हस्ते दीपप्रज्वलन
या व्यवसायाचे उद्घाटन स्वामीनारायण ट्रस्टचे महंत श्री त्यागानंद स्वामी आणि श्री वल्लभ स्वामी श्री निरोधसन स्वामी शास्त्रीय नयन स्वामी आनंद भाई पटेल स्वामीयांच्या शुभहस्ते करण्यात आले. “शुद्धता आणि सेवा भाव जपल्यास व्यवसायाची प्रगती निश्चित होते,” असा आशीर्वाद यावेळी महंतांनी दिला.
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांचा गौरवपूर्ण सहभाग या सोहळ्याचे मुख्य आकर्षण माढा लोकसभेचे कार्यक्षम खासदार माननीय धैर्यशील मोहिते-पाटील हे होते. त्यांनी या नवीन प्रकल्पाला भेट देऊन व्यवसायाच्या संकल्पनेचे कौतुक केले. स्थानिक पातळीवर अशा प्रकारच्या प्रक्रिया उद्योगांमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे खासदार साहेबांच्या हस्ते उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा आणि महत्त्वाच्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. खासदार मोहिते-पाटील यांनी प्रत्येकाशी संवाद साधत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या सर्वांचे आभार शॉप चे ओनर विलास पवार यांनी मानले