अकलूजमध्ये जुन्या वादातून दोन भावांवर खुनी हल्ला; लोणार गल्लीतील ६ जणांच्या टोळीवर गुन्हा दाखल

संपादक सुनील निकम 7038353599
अकलूज (प्रतिनिधी):
अकलूज येथील भोरी वसाहत परिसरात जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी एका तरुणावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुणाला वाचवण्यासाठी आलेला त्याचा भाऊ देखील गंभीर जखमी झाला असून, पोलिसांनी सहा जणांच्या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, राऊत नगर येथील रहिवासी प्रदीप दीपक भोसले हा तरुण भोरी वसाहत परिसरातून जात असताना लोणार गल्लीतील सहा जणांच्या टोळीने त्याला वाटेत अडवले. जुन्या वादाचे कारण उकरून काढत या टोळीने प्रदीपवर लोखंडी रॉडने हल्ला चढवला.
हा हल्ला होत असल्याचे पाहून प्रदीपचा भाऊ अभिषेक दीपक भोसले हा त्याला वाचवण्यासाठी धावून गेला. मात्र, संतापलेल्या हल्लेखोरांनी अभिषेकवरही भीषण हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही भाऊ गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
तपास सुरू
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
तपास अधिकारी: पोलीस निरीक्षक नीरज उबाळे
हल्लेखोर: लोणार गल्लीतील ६ जणांची टोळी चा पोलीस अधिक तपास करत आहेत
अकलूज पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, आरोपींना पकडण्यासाठी चक्रे फिरवली आहेत. भरवस्तीत झालेल्या या खुनी हल्ल्यामुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला आहे की नाही, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.






