शेतकऱ्याच्या साहित्यावर डल्ला मारणारी टोळी गजाआड अकलूज पोलिसांची मोठी कारवाई.
चोरीचा माल घेणाऱ्या दुकानदाराला बेड्या

सहसंपादक महेश पांडवे.9511875416
माळशिरस.
अकलूज .दि.०४/०४/२०२६रोजी शेतकऱ्यांच्या शेतीपंपांच्या मोटारी,
केबल आणि तांब्याची तार चोरणाऱ्या टोळीचा अकलूज पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. चोरीचे हे साहित्य एका भंगार दुकानदाराला विकले जात असताना पोलिसांनी धाड टाकून आरोपींसह दुकानदाराला रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
नेमकी घटना काय
गेल्या काही दिवसांपासून अकलूज आणि परिसरातील शेतातून विद्युत मोटारींच्या केबल आणि तांब्याची तार चोरी होण्याचे प्रमाण वाढले होते. या पार्श्वभूमीवर पोलीस बारकाईने लक्ष ठेवून होते. दरम्यान, चोरी केलेले हे साहित्य एका भंगार दुकानात विक्रीसाठी आणले जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली. यावेळी चोरीचा माल विकणारे आरोपी आणि तो खरेदी करणारा भंगार दुकानदार या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात तांबे तार आणि केबल जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई दबंग पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने यशस्वी केली. या गुन्ह्यात आणखी कोणाचे धागेदोरे आहेत का? तसेच या टोळीने आणखी कुठे चोऱ्या केल्या आहेत, याचा सखोल तपास आता पोलीस करत आहेत.
”शेतकऱ्यांच्या साहित्याची चोरी करणाऱ्यांची आणि त्यांना साथ देणाऱ्यांची गय केली जाणार नाही,” असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.






