क्राईम

अपघात करून पसार झालेली तीन अज्ञात वाहने अखेर पोलिसांच्या जाळ्यात!

तीन मृत्यूंच्या प्रकरणात भुईज पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

 

 

प्रतिनिधी अजित काळेल

सातारा/ राष्ट्रीय महामार्ग व ग्रामीण भागात घडलेल्या तीन वेगवेगळ्या भीषण अपघातांमध्ये निष्पाप नागरिकांचा बळी घेऊन पसार झालेल्या अज्ञात वाहनांचा शोध घेण्यात भुईज पोलिसांना अखेर यश आले आहे. सलग तीन मृत्यूंमुळे खळबळ उडालेल्या या प्रकरणांमध्ये अत्यंत बारकाईने तपास करत पोलिसांनी संबंधित वाहने व चालक निष्पन्न करत गुन्हे उघडकीस आणले आहेतदि. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे मौजे वेळे (ता. वाई) येथील अन्नपूर्णा हॉटेलसमोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर पादचारी अरुण गेणु पवार यांना अज्ञात वाहनाने धडक देऊन ठार केले होते. या प्रकरणी भुईज पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३०२/२०२५ दाखल करण्यात आला होता.त्यानंतर २४ डिसेंबर २०२५ रोजी मौजे पाचवड येथे साई हॉटेलसमोर अज्ञात वाहनाने स्प्लेंडर मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने दीपक शिवाजी निकम (रा. जांब, ता. कोरेगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत गु.र.नं. ३३८/२०२५ नोंदवण्यात आला.तिसरा प्रकार ६ जानेवारी २०२६ रोजी मौजे आसले येथे तुळजाई पेट्रोलपंपाजवळ घडला. दोन दुचाकींमध्ये अपघात झाल्यानंतर रस्त्यावर पडलेल्या संजय कुंडलीक रिटे यांच्या अंगावर अज्ञात वाहन गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची नोंद गु.र.नं. ०७/२०२६ प्रमाणे करण्यात आली होती.तीनही अपघातांमध्ये चालकांनी जखमींना मदत न करता घटनास्थळावरून पलायन केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता.या गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनील साळुंखे (वाई) यांनी स्पष्ट सूचना दिल्या. त्यानुसार भुईज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली.सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक नागरिकांकडील माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे तीनही अज्ञात वाहने निष्पन्न करण्यात आली.तपासात पुढील वाहने व चालक निष्पन्न झाले —वैभव ट्रॅव्हल्स बस (MH 09 GJ 7092) – चालक कुलदीप तानाजी कबाडे (रा. येणपे, ता. कराड)महिंद्रा ट्रॅक्टर (MH 30 E 7595) – चालक कृष्णा काळू ससाणे (रा. सैदापूर, ता. गोवराई, जि. बीड)टाटा ट्रक (MH 04 BU 3608) – चालक संजय बिटू चव्हाण (रा. निंबळक, ता. फलटण)सदर आरोपींवर पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.ही यशस्वी कारवाई भुईज पोलीस स्टेशनचे स.पो.नि. श्री. ताटे, पो.उपनि. पतंग पाटील, सूरज शिंदे, तसेच पोलीस अंमलदार दत्तात्रय शिंदे, आप्पा कोलवडकर, नितीन जाधव, सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते व किरण निंबाळकर यांच्या अथक परिश्रमातून शक्य झाली.या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भुईज पोलीस ठाण्याच्या संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे.निष्पापांचे बळी घेऊन पसार होणाऱ्यांना गाठल्याशिवाय पोलिस शांत बसत नाहीत, हे भुईज पोलिसांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.