क्राईम

इंदापुरात बिअर बारच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय; मालकासह महिला रंगेहात अटक

सहसंपादक महेश पांडवे 9511875416

​इंदापूर:  शहरात ‘हॉटेल’ आणि ‘बिअर बार’च्या नावाखाली छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या कुंटणखान्यावर इंदापूर पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाईमुळे इंदापूर शहरात आणि परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पांढरपेशी व्यवसायांच्या आड चालणाऱ्या काळ्या धंद्यांचा पुन्हा एकदा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये बाहेरून मुली आणून वेश्याव्यवसाय चालवला जात होता. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी एका ‘पंटर’ला (बनावट ग्राहक) त्या ठिकाणी पाठवले. व्यवहार निश्चित होताच पोलिसांनी छापा टाकून संबंधित ठिकाणाहून आक्षेपार्ह साहित्य जप्त केले.इंदापूर ​पोलिसांनी हॉटेल मालकाला ताब्यात घेतले आहे. तसेच, या व्यवसायात मध्यस्थी करणाऱ्या एका महिलेलाही अटक करण्यात आली आहे. पीडित मुलींची सुटका करण्यात आली असून त्यांची रवानगी सुधारगृहात करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
​या प्रकरणाचा पुढील तपास इंदापूर पोलीस निरीक्षक आणि त्यांचे पथक करत असून, यामध्ये आणखी कोणाचे धागेदोरे आहेत का, याचा शोध घेतला जात आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.