काळेपडळ तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी, एकुण 2,56,000/- रु. किंमतीच्या 02 ऑटो रिक्षांची चोरी तसेच रिक्षांचे टायर व स्टेफनी चोरी करणा-या चोरट्यास 24 तासात ठोकल्या बेड्या “

पोलीस क्राईम नामा न्यूज नेटवर्क
काळेपडळ पोलीस ठाणे, पुणे गुन्हा रजि.नं.३९५/२०२५, बीएनएस कलम ३०३(२) मधील आरोपीचा शोध घेत असता, काळेपडळ पोलीस ठाणेचे तपास पथकाचे अमित शेटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पो. हवा. प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुढे, श्रीकृष्ण खोकले, पोलीस अंमलदार सद्दाम तांबोळी, महादेव शिंदे, अतुल पंधरकर, शाहीद शेख, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे व नितीन डोले असे पो.स्टे. हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार शाहिद शेख व अतुल पंधरकर यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, ‘एक इसम हा रिक्षा क्रमांक एम.एच.१२/क्यू. ई./७७०१ या रिक्षामध्ये रिक्षाची टायर ठेवून लक्ष्मीपार्क येथील पालखी मार्ग, हेवन पार्ककडे जाणा-या रस्त्यालगत, गौरी हॉटेलच्या बाजुला रिक्षासह थांबलेला असुन, सदरचे टायर चोरीचे आहेत’ बातमीच्या ठिकाणी स्टाफसह जावून सदर इसमास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव-पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव-पत्ता शादाब युसुफ अन्सारी, वय २० वर्षे, रा. गल्ली नं. २४, सय्यदनगर, हडपसर, पुणे असे असल्याचे सांगितले.
सदरची कामगिरी ही राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली धन्यकुमार गोडसे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, अमर काळंगे, पो. नि. गुन्हे यांचे सुचनेप्रमाणे अमित शेटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पो. हवा. प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, श्रीकृष्ण खोकले, पोलीस अंमलदार विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन डोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर व महादेव शिंदे यांचे पथकाने केली आहे.





