राजकीय

पुण्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का? जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर पक्ष सोडण्याच्या तयारीत; इंदापूरमध्ये फुटीचे संकेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना थेट इशारा?

सहसंपादक महेश पांडवे 951187541

पुणे/इंदापूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप (दादा) गारटकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची तयारी सुरू केल्याने पुणे जिल्ह्यात पक्षाच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतर्गत गटबाजी आणि निवडणुकीच्या धोरणांवरून ते पक्षाच्या नेतृत्वावर नाराज असून लवकरच ते आपल्या पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.​नाराजीचे नेमके कारण काय?

 

गारटकर यांची नाराजी प्रामुख्याने इंदापूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिक तीव्र झाल्याचे बोलले जात आहे. इंदापूरमध्ये निवडणुकीच्या तोंडावरच स्थानिक पातळीवर पक्षात मोठी फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गारडकर समर्थकांना बाजूला सारून काही विशिष्ट गटाला अधिक महत्त्व दिले जात असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला आहे. याच स्थानिक राजकारणामुळे गारटकर यांनी ‘रामराम’ करण्याचा कठोर निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
​इंदापूरमध्ये पक्षाला मोठा धोका
​प्रदीप गारटकर यांच्या भूमिकेमुळे इंदापूर नगरपरिषद निवडणुकीतील राष्ट्रवादीच्या तयारीवर थेट परिणाम होण्याची भीती आहे. गारडकर हे प्रभावी नेतृत्व असल्याने त्यांच्या पक्ष सोडण्याच्या निर्णयामुळे येथील स्थानिक राजकारणावर मोठा परिणाम होऊ शकतो. जर गारटकर यांनी वेगळी भूमिका घेतली, तर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली
​या गंभीर घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, गारटकर यांची समजूत काढण्यासाठी पक्षाचे काही ज्येष्ठ नेते प्रयत्न करत असल्याची माहिती आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.