वाफळे ग्रामस्थांकडून राजन पाटील मालक व आमदार यशवंत तात्या माने यांचा भव्य नागरिक सत्कार….

दादासाहेब जगताप, पश्चिम महाराष्ट्र संपादक.
मोहोळ तालुक्यातील मौजे वाफळे गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व राजनजी पाटील (मालक) आ. यशवंत (तात्या) माने यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर, समस्त वाफळे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला.

या सोहळ्याला ग्रामस्थ, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांमध्ये देवानंद गुंड, मदन पाटील, सतीश भोसले, रामदास चवरे, दत्ता पवार, आप्पासाहेब ढेकळे, सर्जेराव थोरात, प्रा. पोपट भांगे, डॉ. शशिकांत वागज, सचिन बाबर, नितीन मुळे, अज्ञान थोरात, वसंत माने, रमेश टेकाळे, शरद गोडसे, प्रकाश भोसले, सौदागर भोंग, नारायण गुंड, हरिभाऊ गुंड, बाळासाहेब पाटील तसेच सरपंच सौ. वैशाली माळी यांचा समावेश होता.
गावकऱ्यांनी या नागरी सत्काराच्या माध्यमातून आपल्या नेत्यांप्रती सन्मान आणि विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्वांनी भारतीय जनता पक्षाच्या विजयासाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या सोहळ्याचे आयोजन अत्यंत देखणे, शिस्तबद्ध व अनुकरणीय झाले असून, वाफळे गावात ऐतिहासिक एकोपा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.







