अशोक बापू इजगुडे यांच्यासह अनेक मान्यवरांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत,

सहसंपादक महेश पांडवे
पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा गारटकर आणि इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्या विशेष पुढाकाराने इंदापूर तालुक्यातील महत्त्वाचे नेते अशोक बापू इजगुडे यांच्यासह अन्य मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात जाहीर प्रवेश केला.
या पक्षप्रवेशामुळे इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद वाढणार असून, आगामी काळात तालुक्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
अजितदादा पवार यांच्या प्रमुखउपस्थितीत
हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. अशोक बापू इजगुडे आणि त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांचे अजितदादा पवार यांनी पक्षात स्वागत केले व पुढील वाटचालीसशुभेच्छा दिल्या
यावेळी बोलताना, जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा गारटकर यांनी नमूद केले की, अजितदादा पवार यांच्या विकासाच्या दृष्टीवर विश्वास ठेवून अनेक जुने-नवे कार्यकर्ते पक्षात सहभागी होत आहेत. अशोक बापू इजगुडे यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांच्या प्रवेशामुळे इंदापूर तालुक्यात पक्षाला मोठे बळ मिळणार आहे.
तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी सांगितले की, इंदापूर तालुक्यात पक्ष मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. इजगुडे यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने तालुक्यात ‘दादां’चा विकास पॅटर्न अधिक प्रभावीपणे पोहोचेल.
यावेळी पक्षप्रवेश केलेल्या मान्यवरांनी उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्याच्या विकासासाठी पूर्ण क्षमतेने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. या पक्षप्रवेश सोहळ्याला पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







