
आज मुंबई येथे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात भव्य प्रवेश सोहळा पार पडला. प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, राज्याचे ग्रामविकास व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच आमदार सचिनदादा कल्याणशेठी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

या कार्यक्रमात माजी आमदार राजनजी पाटील मालक, माजी आमदार यशवंत (तात्या) माने, सोलापूर जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष व लोकनेते शुगर चेअरमन बाळराजे राजनजी पाटील, सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य अजिक्यराणा राजनजी पाटील यांच्यासह हजारो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.
या प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक ताकद वाढून आगामी राजकारणात महत्त्वपूर्ण बदल घडणार असल्याचे पक्ष नेत्यांनी सांगितले.







