आदर्श माता कै.केशर तानाजी जगताप यांना १२ व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
अंकोली, प्रतिनिधी – दादासाहेब जगताप, पश्चिम महाराष्ट्र संपादक

अंकोली: मोहोळ तालुक्यातील मौजे अंकोली गावातील आदर्श माता व समाजसेवेची ओळख असलेल्या कै. केशर तानाजी जगताप यांच्या १२ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
दिनांक ०२नोव्हेंबर २०२५, बुधवार रोजी त्यांच्या निवासस्थानी कुटुंबीयांच्या उपस्थितीत स्मृतिपूजन व सामूहिक प्रार्थना आयोजित करण्यात आली होती. यावेळी जगताप कुटुंबातील सदस्य तसेच आप्तस्वकीयांनी कै. सौ. केशरताई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला उजाळा दिला.
कै. सौ. केशरताई यांनी आपले संपूर्ण आयुष्य कुटुंब, समाज आणि शेतकरी हितासाठी समर्पित केले. त्यांनी आपल्या कष्ट, त्याग आणि प्रेमाच्या कृतीतून समाजात एक दृढ स्थान निर्माण केले होते. त्यांचे कार्य आणि संस्कारांची परंपरा आजही जगताप परिवाराला आणि अंकोली ग्रामस्थांना प्रेरणादायी ठरत आहे.
या पुण्यस्मरणानिमित्त अंकोली गावातील सर्व नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.







