महाराष्ट्र
कासेगाव मुस्लिम समाजामार्फत हाफीसाहेब यांच्या निवासासाठी 2 खोल्यांच्या बांधकामाचा शुभारंभ .

अंकोली, प्रतिनिधी :- दादासाहेब जगताप,पोलिस क्राईम नामा
पंढरपूर तालुक्यातील मौजे कासेगांव येथे मुस्लिम समाजाच्या वतीने हाफीसाहेब यांच्या निवासासाठी मुस्लिम समाज मंदिराजवळ दोन खोल्यांच्या पायाभरणीचा शुभारंभ करण्यात आला. समाजातील मान्यवरांनी एकत्र येत सामाजिक ऐक्याचे उदाहरण घालत या उपक्रमाचा प्रारंभ केला.या प्रसंगी हाफीसाहेब, बाळासाहेब शेख, चिराग इनामदार, शमशुद्दीन मुलाणी, गफूर जमादार, ताजुद्दीन मुलाणी, रजाक शेख, बाशुद्दीन शेख, चे मालक सदाम शेख, जाकीर जमादार, करिम शेख, तसेच बाळुभैय्या मठवसती यांची प्रमुख उपस्थिती होती.मुस्लिम समाजाद्वारे होत असलेला हा उपक्रम समाजातील बांधिलकी व एकोपा वाढविणारा ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.







