नीर निमगाव येथे संविधान दिन उत्साहात साजरा! विद्यार्थ्यांकडून ‘एकतेचा संदेश’

संपादक. सुनील निकम 7038353599
इंदापूर. निर निमगाव
भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या संविधानाचा स्वीकार दिवस अर्थात ‘संविधान दिन’ नीर निमगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान, अनंतराव पवार प्राथमिक विद्यालय च्या विद्यार्थ्यांनी एक अनोखी कृती करून राष्ट्रीय एकात्मतेचा प्रभावी संदेश दिला.
संविधान दिनाच्या निमित्ताने शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय संविधानाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. मात्र, या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले, ते विद्यार्थ्यांनी साकारलेले ‘एकतेचे प्रदर्शन’.
गोल साखळीतून दिला एकतेचा संदेश
अनंतराव पवार प्राथमिक विद्यालयाच्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी एकत्र येत एक भव्य गोल साखळी तयार केली.

हातात हात गुंफून तयार केलेली ही साखळी, भारतीय संविधानाने आपल्याला दिलेल्या समानता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांचे प्रतीक होती.
”आम्ही सारे एक आहोत” आणि “विविधतेत एकता” हा संदेश या साखळीतून सशक्तपणे पोहोचवण्यात आला.
याप्रसंगी बोलताना माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापकांनी भी. जे. गरगडे मुख्याध्यापक सी .बी. पिसे संविधान मूल्य हक्क या विषयी मार्गदर्शन केले एस एम घोगरे यांनी आभार मानले उपस्थित संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय घोगरे व उपाध्यक्ष रणजीत घोगरे सचिव घोगरे यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले .







