महाराष्ट्र

कालकथित सरुबाई शिंदे यांचे प्रथम पुण्यस्मरण टाकेवाडी येथे संपन्न :

माण .प्रतिनिधी. महावीर शिंदे

ता. माण .टाकेवाडी. येथील कालकथित सरूबाई शिंदे यांचे प्रथम पुण्यस्मरण विविध उपक्रमांनी संपन्न झाले महाराष्ट्रातील ख्यातनाम लोकशाहीर माणदेशभुषण महावीर शिंदे यांच्या त्या मातोश्री होत्या , १०५ वर्षे इतके दिर्घायुष्य त्यांना लाभले , अतिशय खडतर व गरीबीच्या परिस्थितीला त्यांना सामोरे जावे लागले , शिक्षण नव्हते परंतू त्यांची संतवाणी तोंडपाठ होती संत तुकाराम महाराज यांचे अभंग , एकतारी भजन , संत कबीरजींचे दोहे हे अगदी सहजपणे सांगत असत पहाडी आवाज व निर्भय जिवन त्या जगल्या अशा आदर्श मातेचा आज प्रथम पुण्यस्मरण दिन संपन्न झाला सदर कार्यक्रमास सिद्धार्थ गायन पार्टी हिंगणी यांचे गीत गायनांचा कार्यक्रम , व्याख्याते महावीर भालेराव , राजाळे यांचे व्याख्यान झाले , या कार्यक्रमास माण पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब रणपिसे , वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष युवराज भोसले , राष्ट्रीय ज पक्ष संदीप खरात , भारतीय बौद्ध महासभेचे कोषाध्यक्ष नंदकुमार शिंदे , एसआरपीएफ जवान विपुल अहिवळे टाकेवाडीचे सरपंच निलेश दडस , माजी सरपंच पत्रकार दत्ता भोसले , बौद्ध महासभेचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी काही आप्तेष्टांनी आपले मनोगत व्यक्त केले

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.