आरोग्य व शिक्षण

भैरवनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अंकोली येथे बारावीची परीक्षा शांततेत सुरू;

310 बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंद

प्रतिनिधी दादासाहेब जगताप

अंकोली (ता. मोहोळ) :- राज्यभरात सध्या इयत्ता 12 वीची बोर्ड परीक्षा सुरू असून, ग्रामीण भागातील परीक्षा केंद्रांवरही विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून येत आहे. मोहोळ तालुक्यातील मौजे अंकोली येथील भैरवनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अंकोली येथे बारावीची परीक्षा अतिशय शांततेत, शिस्तबद्ध आणि सुरळीत पद्धतीने पार पडत आहे.
या परीक्षा केंद्रावर अंकोली परिसरासह जवळच्या विविध गावांमधून विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत आहे. त्यामुळे परीक्षा केंद्र प्रशासनाने परीक्षा प्रक्रियेचे नियोजन काटेकोर व नियमानुसार केले आहे.
शिक्षक व पर्यवेक्षकांचे काटेकोर नियोजन
या परीक्षा केंद्रावर परीक्षा व्यवस्थापनासाठी प्रा. जाधव के. के. व प्रा. महेश पाटील यांची महत्त्वपूर्ण भूमिका असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रावरील संपूर्ण परीक्षा प्रक्रिया राबविण्यात येतआहे.
तसेच परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक दादासाहेब पवार यांच्या नियंत्रणाखाली परीक्षा नियमांचे पालन काटेकोरपणे होत असून, विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व सहकार्य दिले जात आहे.
यासोबतच केंद्रावर बडे सर, बसाप्पा पुजारी सर, गूटाळकर सर, अमोल राठोड सर हे शिक्षकही आपापली जबाबदारी चोख पार पाडत असून, परीक्षा केंद्रावरील शिस्त व पारदर्शकता कायम ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठीभैरवनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अंकोली येथे बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्यामुळे केंद्रावर दररोज सकाळपासूनच विद्यार्थ्यांची गर्दी दिसून येते.विद्यार्थ्यांना वेळेवर केंद्रावर पोहोचण्यासाठी मार्गदर्शन, प्रवेशपत्र तपासणी, बैठक व्यवस्था, परीक्षा कक्षातील नियोजन तसेच आवश्यक सूचना देण्यासाठी परीक्षा केंद्रावर योग्य पद्धतीने व्यवस्था करण्यात आली आहे.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.