अकलूज नगर परिषदेचा मोठा निर्णय: सफाई कामगारांच्या वेतनात दोन हजार रुपयांची घसघशीत वाढ!
नगराध्यक्षा सौ. रेश्माताई आडगळे आणि उपनगराध्यक्ष श्री.शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या पुढाकाराला यश

सहसंपादक महेश पांडवे9511875416
अकलूज:
शहराच्या स्वच्छता आणि आरोग्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या सफाई कामगारांच्या हितासाठी अकलूज नगर परिषदेने एक मोठा आणि कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.रेश्माताई लालासाहेब आडगळे आणि उपनगराध्यक्ष श्री.शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या विशेष पुढाकारातून नगर परिषदेच्या सफाई कामगारांच्या मासिक वेतनात दोन हजार रुपयांची (₹२,०००) वाढ करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून, सर्व स्तरांतून या निर्णयाचे स्वागत होत आहे.
कामाची पावती आणि आर्थिक हातभार उन्हातान्हाची, वारा-पावसाची परवा न करता अकलूज शहराला सुंदर आणि स्वच्छ ठेवण्याचे मुख्य काम हे सफाई कर्मचारी करत असतात. त्यांच्या या प्रामाणिक कष्टाची दखल घेऊन, त्यांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या उद्देशाने नगराध्यक्षा व उपनगराध्यक्षांनी या वेतनवाढीचा प्रस्ताव ठेवला होता. त्याला मंजुरी मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात थेट २,००० रुपयांची वाढ होणार असून, महागाईच्या काळात त्यांच्या कुटुंबाला यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
”सफाई कामगार हे आपल्या शहराचे खरे वैभव आणि आरोग्याचे रक्षक आहेत. त्यांच्या कष्टाचे मूल्य पैशात होऊ शकत नाही, परंतु प्रशासनाच्या वतीने त्यांना सन्मान आणि आर्थिक बळ देणे हे आपले कर्तव्य आहे. याच भावनेतून आम्ही हा निर्णय घेतला आहे.”समन्वय आणि गतिमाननेतृत्व
अकलूज नगर परिषदेच्या माध्यमातून शहराचा विकास साधत असतानाच, समाजातील शेवटच्या घटकाचा विकासही तितकाच महत्त्वाचा आहे, हा विचार उपनगराध्यक्ष यांनी नेहमीच मांडला आहे. त्यांच्या आणि नगराध्यक्षांच्या एकत्रित समन्वयामुळे व संवेदनशील नेतृत्वामुळे हा कर्मचारीभिमुख निर्णय अत्यंत जलद गतीने मार्गी लागला.
कर्मचाऱ्यांकडून आनंदोत्सव आणि आभार या ऐतिहासिक वेतनवाढीची घोषणा होताच अकलूज नगर परिषदेच्या सफाई कामगारांनी प्रशासनाचे आणि नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांचे जाहीर आभार मानले आहेत. “आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नेतृत्व अकलूजला लाभले आहे,” अशा भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.







