बारामती: म ए सो माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयाचा इयत्ता १२ बॅच 2001 चे माजी विद्यार्थी तब्बल २४ वर्षानंतर एकत्र येत स्नेहमेळाव्याचे आयोजन
या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या विकासासाठी एकत्र येऊन ₹1 लाखांचा धनादेश कॉलेजला सुपूर्द केला.

महाराष्ट्र प्रतिनिधी हिरालाल शिंदे
सर्व माजी विद्यार्थी सकाळी १० वाजता प्रार्थना चौकात उपस्थित राहिले, शाळेकडून त्यांना अल्पोप्रहार देण्यात आला, जी. वाय. जाधव सर यांनी विदयार्थ्यांना त्यांच्या वर्गात पाठविले, वर्गात विद्यार्थ्यांनी स्वपरिचय करून दिला . विद्यार्थ्यांचे माजी शिक्षक सुर्यगंधे सर यांचेकडून हजेरी घेण्यात आली , यावेळी विद्यार्थ्यांचे इतर माजी शिक्षक चव्हाण सर, गावडे सर , सोनावणे सर , सातव सर उपस्थित होते. तर सर्वांनी बोडके पाटील मॅडम यांची आठवण काढली. शाळेच्या विद्यार्थिनींनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे औक्षण केले.
अध्यक्षस्थानीशाळा समितीचे अध्यक्ष अजय पुरोहित होते. त्याचप्रमाने संगीत पुरोहित , पुरूषोत्तम कुलकर्णी , मुख्याध्यपक धनंजय मेळकुंडे , परिवेक्षक शेखर जाधव उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरवात झाली , संगीत शिक्षिका रसिक सुर्वे यांनी स्वागत गीत सादर केले , यानंतर माजी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. मनोगतातून सर्व जुन्या आठवणींना उजाळा दिला . व पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्तविक माजी विद्यर्थी हिरालाल शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन सचिन गाडेकर व सारिका गाडेकर यांनी केले, मयुरा झगडे व रुपाली भोईटे यांनी आभार मानले. सर्व मान्यवरांचा सत्कार माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला.
या उपक्रमात शाळेचे परिवेक्षक प्रा . शेखर जाधव व माजी विद्यार्थी संतोष गोळे, सादिक मुलाणी, संदीप गोफणे, अशोक तनपुरे, राम तांदले, राहुल वायसे, नितीन मोरे, रेखा भोसले, सुप्रिया तांबडे, छाया डाळ यांनी विशेष योगदान दिले.
शाळा प्रशासनाने या माजी विद्यार्थ्यांच्या सामाजिक बांधिलकीचे आणि संस्थेप्रती असलेल्या प्रेमाचे कौतुक केले.



