बुके नको… पुस्तक हवे!” टेंभूर्णी पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांचा समाजासाठी प्रेरणादायी व स्तुत्य उपक्रम

महाराष्ट्र कार्यकारी संपादक. दादासाहेब जगताप
टेंभुर्णी.
सत्कारात फुलांच्या गुच्छाला नकार; त्याऐवजी मिळालेली पुस्तके गरजू विद्यार्थ्यांना भेट देण्याचा अभिनव निर्णय वाचन संस्कृतीला मिळणार नवी दिशा
पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर एक वेगळाच आदर्श समाजासमोर ठेवला आहे. विविध सामाजिक संस्था, संघटना व प्रतिष्ठित नागरिकांकडून होणाऱ्या सत्कारावेळी फुलांचे बुके स्वीकारण्याऐवजी “बुके नको… पुस्तक हवे!” अशी आगळीवेगळी संकल्पना त्यांनी राबवली आहे.
या उपक्रमांतर्गत सत्कारावेळी मिळणारी पुस्तके गरजू, होतकरू व सर्वसामान्य विद्यार्थ्यांना भेट देण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यास मदत होणार असून, ज्ञानदानाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा संदेश पोहोचणार आहे.
आजच्या काळात दिखाऊपणापेक्षा ज्ञानाला प्राधान्य देणारा हा उपक्रम सर्व स्तरांतून कौतुकास पात्र ठरत आहे. पोलीस अधिकारी म्हणून कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळतानाच सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण क्षेत्रासाठी पुढाकार घेणाऱ्या बाळासाहेब भरणे यांच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
या प्रेरणादायी उपक्रमाचे पोलीस क्राईम नामाचे मुख्य संपादक महेश खडके संपादक सुनील निकम तसेच सहसंपादक महेश पांडवे यांनी मनःपूर्वक स्वागत करून भरणे यांच्या सामाजिक दृष्टीकोनाचे कौतुक केले आहे. त्यांनी हा उपक्रम राज्यभर आदर्श ठरावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.फुलांचा सुगंध काही क्षणांचा असतो; पण पुस्तकातील ज्ञान आयुष्यभर सोबत राहते” या विचाराला मूर्त रूप देणारा हा उपक्रम निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.







