सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ला निंदनीय!
विषारी विचारधारा संपवण्यासाठी बहुजन ब्रिगेड महासंघाचे विभागीय आयुक्त यांना निवेदन

पोलिस क्राईम नामा न्यूज नेटवर्क
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मा भुषण गवई यांच्यावर राकेश किशोर या नावाच्या मनुवादी व्यक्तीने हल्ला केला ही घटना अत्यंत दुर्दैवी असंविधानिक आणि निंदनीय आहे.
देशाच्या सर्वोच्च न्याय संस्थेच्या प्रमुखावर हा प्रकार फक्त वैयक्तिक हल्ला नसुन भारतीय न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेला आघात करणारा आहे.
तरी या झालेल्या घटनेचा एक वैयक्तिक हल्ला नसुन ,ही एक विषारी विचारधारा आहे.या विषारी विचारधारेला आपण थांबवलेच पाहिजे.
अशा प्रकारच्या काही घटनांमुळे समाज विघातक घटक जातीय आणी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
त्यामुळे सरकारने स्वतः हुन आरोपी राकेश किशोर यांच्यावर गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करावी .
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला सर्वसमावेशक घटना म्हणजे संविधान प्रदान केलं आहे.या संविधानाच्या केंद्रस्थानी लोकांना ठेऊन ही घटना बाबासाहेबांनी देशाला सुपुर्द केली आहे.आपण जगा आणि इतरांनाही जगु द्या असा घटनेचा केंद्रबिंदू आहे, परंतु कायदा हातात घेऊन अराजकता माजवण्याचा कोणालाही या देशात अधिकार नाही.सर्वांनी आपले प्रश्न शांततेने आणि संविधानिक मार्गाने सोडवुन घ्यावेत.
तसेच भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी असे बहुजन ब्रिगेड महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
हे निवेदन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपजी मोहीते, उपाध्यक्ष गणेशभाऊ साठे यांच्या स्वाक्षरीने संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे यांना आज देऊन सदर घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.
सदरचे निवेदन हे मा विभागीय आयुक्त सो यांचे वतीने अप्पर आयुक्त (महसूल) मा तुषार ठोंबरे साहेब यांनी स्विकारले आणि महाराष्ट्र शासनाकडे पाठविण्यात आले.







