राजकीय

हारकर जीतने वाले को बाजीगर कहते है!’… सोलापूर विधान परिषदेत पराभवानंतरही खासदार धैर्यशील मोहिते-पाटील ठरले ‘किंगमेकर’

एका बाजूला मोठी फौज दुसऱ्या बाजूला एकटा वाघ

सह संपादक. महेश पांडवे 9511875416

​सोलापूर:
‘राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही’ याचाच प्रत्यय सोलापूर जिल्हा विधान परिषद आमदार निवडणुकीच्या निकालावरून पुन्हा एकदा आला आहे. या निवडणुकीत कागदोपत्री पराजय झाला असला, तरी खऱ्या अर्थाने या संपूर्ण लढतीचे ‘बाजीगर’ आणि ‘किंगमेकर’ ठरले आहेत ते माढा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते-पाटील! “हारकर जीतने वाले को बाजीगर कहते है,” हा संवाद सध्या सोलापूरच्या राजकीय वर्तुळात मोहिते-पाटलांच्या समर्थकांकडून मोठ्या अभिमानाने चर्चिला जात आहे.​एका बाजूला मोठी फौज; दुसऱ्या बाजूला एकटा वाघ!​या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. मोहिते-पाटलांना रोखण्यासाठी खुद्द एक मुख्यमंत्री, एक पालकमंत्री आणि तब्बल ११ आमदारांची तगडी फौज मैदानात उतरली होती. एवढी मोठी राजकीय यंत्रणा, अफाट रसद आणि सत्तेचा पूर्ण पाठिंबा एका बाजूला असताना, दुसऱ्या बाजूला मात्र खासदार धैर्यशील मोहिते-पाटील हे एकटे खिंड लढवत होते.
​असा चालवला ‘मोहिते-पाटील पॅटर्न’
​संख्याबळ विरोधात असताना आणि समोर दिग्गजांचे आव्हान असतानाही धैर्यशील मोहिते-पाटील यांनी रचलेली रणनीती थक्क करणारी ठरली.
​मते खेचण्यात यश: सत्ताधाऱ्यांकडे असलेल्या आमदारांच्या फौजेला खिंडार पाडत मोहिते-पाटलांनी मोठ्या प्रमाणात मते आपल्या बाजूने वळवण्यात यश मिळवले.
​बंडखोरी रोखण्यात अपयश: समोरच्या छावणीत ११ आमदार असूनही त्यांना आपल्या मतदारांना एकसंध ठेवता आले नाही, हेच मोहिते-पाटलांच्या ‘मायक्रो-प्लॅनिंग’चे यश दर्शवते.
​ताकद सिद्ध केली: या निवडणुकीच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्रे अजूनही ‘शिवरत्न’ मोहिते-पाटील निवासस्थान वरूनच हलतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
​”सत्ता, पैसा आणि ११ आमदारांची फौज विरुद्ध जनतेचा पाठिंबा असलेला एक खासदार… लढत सोपी नव्हती. पण धैर्यशील मोहिते-पाटलांनी ज्या पद्धतीने ही निवडणूक लढवली, त्याने विरोधकांच्या तोंडचे पाणी पळवले. हा पराभव नसून आगामी काळातील मोठ्या विजयाची नांदी आहे.”

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.