भाजपचा मास्टरट्रोक समाज कल्याण समितीच्या सभापती पदाची धुरा सौ.संस्कृती ताई सातपुते यांच्याकडे

सहसंपादक महेश पांडवे 9511875416
सोलापूर:
माळशिरस .भारतीय जनता पार्टीचे नेते आणि मा.आमदार रामभाऊ सातपुते यांच्या पत्नी सौ.संस्कृतीताई सातपुते यांची सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीच्या सभापती पदे बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे जिल्ह्यासह माळशिरस तालुक्याच्या राजकारणात सातपुते परिवाराचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या रिक्त असलेल्या सभापती पदांसाठी आज विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने संस्कृतीताई सातपुते यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. निर्धारित वेळेत दुसरा कोणताही अर्ज न आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची अधिकृत घोषणा केली.
विकासकामांना मिळणार गती
समाज कल्याण समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनुसूचित जाती, जमाती आणि दुर्बल घटकांसाठी विविध योजना राबवल्या जातात. संस्कृतीताई यांच्या निवडीमुळे या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होईल आणि ग्रामीण भागातील गरजू लाभार्थ्यांपर्यंत शासनाचे निर्णय पोहोचण्यास मदत होईल, असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे.
ठिकठिकाणी जल्लोष
या निवडीनंतर सोलापूरसह माळशिरस आणि सातपुते यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आणि पेढे वाटून जल्लोष केला. “सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून परिवर्तन घडवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन,” अशी प्रतिक्रिया निवडीनंतर संस्कृतीताई सातपुते यांनी दिली.







