अकलूजमध्ये भाजप स्थापना दिनानिमित्त भव्य रॅली; ‘रामभाऊ सातपुते’ यांच्या मार्गदर्शनाखाली शक्तीप्रदर्शन

प्रतिनिधी सचिन उगाडे
अकलूज :
भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आज अकलूज शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या रॅलीत सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती संस्कृतीताई यांची प्रमुख उपस्थिती होती. या रॅलीच्या माध्यमातून भाजप कार्यकर्त्यांनी शहरात मोठे शक्तीप्रदर्शन केले.
केसरीमय झाले अकलूज शहर
सकाळी १० वाजता अकलूजमधील मुख्य चौकातून या रॅलीला प्रारंभ झाला. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या हजारो कार्यकर्त्यांच्या हातात भाजपचे झेंडे आणि ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. संपूर्ण अकलूज शहर यावेळी केसरीमय झाल्याचे पाहायला मिळाले.
प्रमुख उपस्थितांचे मार्गदर्शन

कार्यक्रमाच्या वेळी बोलताना सभापती संस्कृती ताई यांनी भाजपच्या ध्येयधोरणांचा उल्लेख करत कार्यकर्त्यांना अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन केले. “सामान्य माणसाच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या भाजपचा विचार घराघरात पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत,” असे त्यांनी यावेळी नमूद केले.
माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीचे नियोजन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते.
शिस्तबद्ध सहभाग: रॅलीमध्ये महिला, तरुण आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहसहभा होता
यावेळी भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रॅलीची सांगता झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.







