राजकीय
इंदापूरवर राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) झेंडा; भरतशहा नगराध्यक्षपदी विराजमान!

- संपादक सुनील निकम 7038353599
इंदापूर:
राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे ज्येष्ठ नेते भरत शेठ शहा यांची निवड झाली आहे. या विजयामुळे इंदापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
विजयाचा जल्लोष आणि गुलाल
निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर भरत शहा यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. “अजित दादा पवार झिंदाबाद” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत समर्थकांनी भरत शहा यांची विजयी मिरवणूक काढली.
विकासाला गती देणार: भरत शहा
नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना भरत शहा म्हणाले की, “हा विजय माझा नसून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वावर जनतेने दाखवलेला विश्वास आहे. इंदापूर शहराचा प्रलंबित विकास, पाणीप्रश्न आणि पायाभूत सुविधांना प्राधान्य देऊन शहराचा कायापालट करणे हेच माझे मुख्य ध्येय असेल.”



