अकलूजमधील.झोपडपट्टीवासीयां हक्काच्या घराचे स्वप्न साकारणार 74 पात्र लाभार्थ्याचा प्रस्ताव नगर परिषदेकडे सादर.
नगरसेविका दिपालीताई वाघमोडे यांच्या सातत्य पाठपुराव्याला अखेर यश.

प्रतिनिधी सचिन उगाडे .
अकलूज. अनेक वर्षांपासून स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या अकलूजमधील.झोपडपट्टीवासीयांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाच्या १ जानेवारी २०११ पूर्वीची सरकारी जागेवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या धोरणानुसार, आता नागरिकांना त्यांच्या घराचा कायदेशीर हक्क मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे!
पाठपुराव्यामुळे १०७० झोपडपट्टी भागातील ७४ पात्र लाभार्थ्यांचा अतिक्रमण नियमितीकरणाचा परिपूर्ण प्रस्ताव अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. सचिन पाटील यांच्याकडे अधिकृतरीत्या सादर करण्यात आला आहे. मुख्याधिकाऱ्यांनी यावर जलद आणि सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
या निर्णयामुळे काय फायदा होईल?
मालकी हक्क: अनेक वर्षांपासून शासकीय जागेवर राहणाऱ्या कुटुंबांना हक्काचे घर मिळणार.
शासकीय योजनांचा लाभ: घरकुल योजनांसह पाणी, वीज अशा मूलभूत सोयी-सुविधा अधिकृतपणे उपलब्ध होणार.
कायदेशीर आधार: बेघर होण्याची भीती कायमची संपुष्टात येणार.
”अनेक वर्षांपासून हक्काच्या घरासाठी संघर्ष करणाऱ्या १०७० झोपडपट्टीतील बांधवांना न्याय मिळवून देणे हे आमचे कर्तव्य आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल आणि नागरिकांना नक्कीच दिलासा मिळेल.”उपस्थित सर्व नगरसेवक नगरसेविका विभागातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते







