महिला एसटी वाहकास मारहाण करणाऱ्या दोन तरुणांना दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा; माळशिरस न्यायालयाचा निकाल

सहसंपादक महेश पांडवे 9511875416
माळशिरस: अकलूज
घटना २ फेब्रुवारी २०१८ मध्ये कर्तव्यावर असलेल्या एसटी महामंडळाच्या महिला वाहकाला मारहाण व विनयभंग केल्याप्रकरणी माळशिरस न्यायालयाने दोन तरुणांना दोषी ठरवत दोन वर्षांची सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे सरकारी कर्मचाऱ्यांवर हात उचलणाऱ्या गुंडांना कडक इशारा मिळाला आहे.
पीडित महिला वाहक एसटी बसमध्ये आपले कर्तव्य बजावत असताना आरोपींनी त्यांच्याशी वाद घालून सरकारी कामात अडथळा निर्माण केला होता. वादाचे रूपांतर पुढे मारहाणीत झाले होते. या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता आणि संबंधितांवर अकलूजपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
न्यायालयीन प्रक्रिया आणि निकाल
गेल्या काही वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी माळशिरस न्यायालयात सुरू होती. सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवत भा. द.वी. कलम.३५३.३३२.५०४.५०६ आणि ५४ आर्थिक २०००. दंडाचे शिक्षा सुनावली
सरकारी कामात अडथळा आणणे आणि महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग/मारहाण करणे.
महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि विशेषतः सार्वजनिक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील वाढते हल्ले पाहता, न्यायालयाने दिलेला हा निकाल अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. “सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे हा गंभीर गुन्हा असून, अशा प्रवृत्तींना कायद्याचा धाक बसणे आवश्यक आहे यासाठी पोलीस हवालदार रियाज तांबोळी व हरिष भोसले यांनी सहकार्य केले कारवाईसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके साहेब आणि अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे साहेब यांचे सहकार्य लाभले.
