मोहोळ तालुका शहर व ग्रामीण पत्रकार संघाच्या नवी कार्यकारिणी जाहीर.
अध्यक्षपदी अरुण भोसले यांची निवड.

दादासाहेब जगताप, पोलिस क्राईम नामा न्यूज पश्चिम महाराष्ट्र संपादक.
अंकोली.
मोहोळ .तालुका शहर व ग्रामीण पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून संघाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. पत्रकार संघातील मान्यवर व सदस्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल अध्यक्षांनी समाधान व्यक्त करत संघाच्या माध्यमातून पत्रकारांच्या हितासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
संघाच्या उपाध्यक्षपदी विलास पवार, सचिवपदी श्रावण तीर्थ, तर खजिनदारपदी दादासाहेब जगताप यांची निवड करण्यात आली आहे. नव्या पदाधिकाऱ्यांवर संघटनेच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्याने संघ अधिक सक्षमपणे कार्य करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
पत्रकारांच्या विविध अडचणी, समस्या व अधिकार यासाठी संघ संघटितपणे आवाज उठवेल. तसेच समाजहिताच्या, लोकहिताच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकार संघ सक्रिय भूमिका बजावेल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून मोहोळ तालुक्यातील पत्रकारिता अधिक सशक्त, निर्भीड व विश्वासार्ह बनेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
