सातारा येथे जननायक बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती थाटात.

सातारा प्रतिनिधी. कैलास कुंभार
सातारा / आर पी आय चे अध्यक्ष संजय तात्या गाडे यांनी 150 वी जयंती बिरसा मुंडा यांची साजरी केली त्यावेळेस जननायक बिरसा मुंडा यांची इंग्रजांकाली जे देश प्रेम होते ते सविस्तर जनसमुदायास सांगितले
आदिवासी करिता जननायक बिरसा मुंडा यांनी केलेले कार्य आपण पुढे घेऊन जाणार आहे तसेच आदिवासी हे माझे कुटुंब आहे मी त्यांच्यातील एक सदस्य आहे आज पर्यंत मला त्यांनी भरपूर प्रेम दिलेला आहे अर्ध्या रात्री सुद्धा मी आदिवासी समाजासाठी उभा राहील अशी ग्वाही देत असताना त्यांनी आदिवासी बांधवांसाठी येत्या 151 व्या जयंती माझ्या आदिवासी बांधवांना जातीचे दाखले व हक्काचे घर मिळाले पाहिजे याकरिता आम्ही शासन दरबारी पाठपुरावा करून पूर्णपणे प्रयत्न करून आदिवासी हक्कासाठी लढा देऊ आणि येत्या जयंतीला तो पूर्ण करू असे आश्वासित केले जयंतीनिमित्त आरपीआय गटाचे पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रग्रहण दादा कांबळे जिल्हाध्यक्ष संजय तात्या गाडे महिला अध्यक्ष रेखाताई सकट युवा जिल्हाध्यक्ष विलास भाऊ कांबळे युवक उपाध्यक्ष गणेश माने आदिवासी जिल्हाध्यक्ष आघाडी शंकरराव हुईके सातारा तालुकाध्यक्ष अनिल धोत्रे शहराध्यक्ष श्रावण भाऊ फुलावडे आदी उपस्थित होते.







