भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारणी सदस्य राजेश विठ्ठल शेटे यांचे सातारा पंचायत समिती यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन.

प्रतिनिधी कैलास कुंभार
9970506100
बोलताना राजेश शेटे असे बोलले की माहिती अधिकार अधिनियम 2005 खाली माहिती मिळण्याचा अर्ज दिला होता. प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून मला माहिती मिळाली नाही लिंब ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे 15 वित्त आयोग आराखडा मध्ये कामे नसताना सुद्धा कामाची परस्पर बीले काढली आहेत तसेच ग्रामनिधी खात्यावरील परस्पर रोखीने खर्च केलेला आहे तसेच माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये मी माहिती मागितली असताना मला टाळाटाळ करणे व गोड बोलून टाळणे हा प्रकार चाललेला आहे. व प्रामुख्याने पंचायत समिती व्हिडिओ व काकडे साहेब यांना लिंबगावची परिस्थिती सांगितली असून सुद्धा आम्हाला ग्रामसेवक दिला जात नाही जो ग्रामसेवक दिला आहे तो कुठल्या ना कुठल्या कारणास्तव गैरहजर असतो सातारा तालुक्यातील सर्वात मोठे लिंब गाव आहे या गावाला प्रशासकीय कोणी वाली आहे का नाही आणि जर हा विषय असाच भिजत राहिला तर मी पुढे आंदोलन तीव्र करेन सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारणी सदस्य राजेश विठ्ठल शेटे यांनी इशारा दिला







