अण्णासाहेब कोकाटे यांच्या वतीने मुस्लीम समाज बांधवांसाठी अजमेर यात्रेचे आयोजन
धडाडीचे समाजसेवक अण्णासाहेब कोकाटे यांच्याकडून विविध विकासकामांचा आणि लोकोपयोगी उपक्रमांचा धडाका

सहसंपादक ..महेश पांडवे मो .9511875416
सराटी: ग्रामपंचायत सदस्य असल्यापासूनच स्वखर्चातून आणि लोकसहभागातून विविध विकासकामे तसेच सामाजिक उपक्रम राबवून अण्णासाहेब कोकाटे यांनी सराटी आणि परिसरातील गावांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. हनुमंत कोकाटे ,गारटकर दादा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे विकासकामे आणि सेवाकार्य सुरू ठेवले आहे.

अण्णासाहेब कोकाटे यांनी मुस्लीम समाज बांधवांसाठी अजमेर यात्रेचे आयोजन करून सामाजिक एकोप्याचे आणि सर्वधर्म समभावाचे उत्कृष्ट उदाहरण दिले आहे.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी गिरवी गावचे सरपंच पाडुरंग डीसले,उस्मान शेख (लुमेवाडी),उपसरपंच संतोष कोकाटे,समिर ताबोळी,नरसिहपूरचे माजी सरपंच नाथाजी मोहीते,गा.प. सदस्य विक्रम घोगरे (बावडा) सचिन महाराज, टनु गावचे महेश सुतार,नुरमहमद शेख, हंबीरराव शिंदे,लुमेवाडी उपसरपंच रामभाऊ कोकाटे,मोहन काटे,बाळासाहेब,कोकाटे, नवनाथ कोकाटे,सुरेश भाऊ कोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते.







