आर.पी.आय. जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांचा ‘नागड्या प्रशासना’वर हल्लाबोल
रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी!

सातारा प्रतिनिधी…कैलास कुंभार
सातारा: महाराष्ट्रातील नागड्या प्रशासनाचे विदारक चित्र जनतेसमोर आणत असल्याचे सांगत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) चे जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना तातडीने पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाभरातील RPI चे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोलताना संजय गाडे यांनी पोलीस प्रशासनाच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जिल्ह्यात या प्रशासनाचे नेमके चाललंय काय,याची उत्तरे अजूनही अनुत्तरीत आहेत प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
गाडे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या कार्यक्षमतेवरही बोट ठेवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.माझ्या जिल्ह्यामध्ये अनेक महिला भगिनींना न्याय मिळत नसेल,तर रुपाली चाकणकर यांनी त्या पदावरती राहू नये. त्यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा अन्यथा, आमच्या स्टाईलने आम्ही प्रशासनाला त्याचा जाब विचारू असा इशाराच त्यांनी दिला.







