अंकोलीत श्री भैरवनाथांच्या जन्माष्टमी निमित्त हरिनाम सप्ताहाचे आयोजन…

दादासाहेब जगताप संपादक. पश्चिम महाराष्ट्र मो.8055651300
मोहोळ तालुक्यातील मौजे अंकोली येथील ग्रामदैवत भैरवनाथांच्या जन्माष्टमी सोहळ्यानिमित्त गुरुवार, दि. ६ नोव्हेंबरपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने गावात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, परिसर भक्तिमय झाला आहे.
सप्ताहाचा शुभारंभ गुरुवार, दि. ६ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता श्री भैरवनाथ मूर्ती, व्यासपीठ, कलश, दीप, प्रतिमा, गाथा, ध्वज, टाळ, पेटी, पखवाज, विणा पूजनाने करण्यात येणार आहे. सायं. साडे सहा वाजता ह.भ.प. अशोक मोरे (ब्रह्मपुरी) महाराज यांचे प्रवचन व रात्री नऊ वाजता ह.भ.प. अनुसया पुरी महाराज (मुगाव, ता. परांडा) यांचे कीर्तन होईल.
शुक्रवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी सायं. साडे सहा वाजता ह.भ.प. आगतराव डोके महाराज (इंचगाव) यांचे प्रवचन व रात्री नऊ वाजता ह.भ.प. अविनाश भारती महाराज यांचे कीर्तन आयोजित आहे.
शनिवार, दि. ८ नोव्हेंबर रोजी सायं. साडे सहा वाजता ह.भ.प. हनुमंत भोसले महाराज (पापरी) यांचे प्रवचन व रात्री नऊ वाजता ह.भ.प. मुक्ताई काळे महाराज (वेरुळकर) व शिवानी ताई महाराज यांचे जुगलबंदी कीर्तन होईल.
रविवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी सायं. साडे सहा वाजता ह.भ.प. अतुल पवार महाराज (अंकोली) यांचे प्रवचन व रात्री नऊ वाजता समाज प्रबोधनकार ह.भ.प. कबीर आत्तार महाराज (सातारा) यांचे कीर्तन आयोजित आहे.
सोमवार, दि. १० नोव्हेंबर रोजी सायं. साडे सहा वाजता ह.भ.प. पंकज गुंड महाराज (डोणगाव) यांचे प्रवचन व रात्री नऊ वाजता ह.भ.प. किरण बोधले महाराज (पंढरपूर) यांचे कीर्तन होईल.
मंगळवार, दि. ११ नोव्हेंबर रोजी सायं. साडे सहा वाजता ह.भ.प. भगवंत पवार महाराज (अंकोली) यांचे प्रवचन व रात्री नऊ वाजता ह.भ.प. नितीन जगताप महाराज (हिप्परगा, ता. औसा) यांचे कीर्तन होईल.
बुधवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज (सोलापूर) यांच्या श्री भैरवनाथ जन्मकिर्तनाने सप्ताहाचा सोहळा रंगणार आहे. दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी श्री भैरवनाथाचा जन्म सोहळा, फुलांची उधळण व महाप्रसाद वाटप पार पडेल. त्यानंतर दुपारी दोन वाजता ह.भ.प. योगेश बप्पा इंगळे (देवदारफळ, जि. धाराशिव) महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाचा समारोप होईल.
संपूर्ण सप्ताह काळात ह.भ.प. शिवाजी केरू जगताप महाराज यांची विना कीर्तन सेवा सादर होणार आहे. तसेच दररोज रात्री ११ वाजता जागर व भारूडाचे कार्यक्रम होतील. भाविकांसाठी दररोज दिवसभर अन्नदानाची सोय करण्यात आली आहे.
गावकऱ्यांच्या वतीने सर्व श्रद्धाळू भक्तांनी या पवित्र व भक्तिमय सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.







